मराठी महत्वाची अशी निवडक ३२५ सामान्य ज्ञान प्रश्नावली

 Q1. बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे? -

चंद्रपूर


Q2. राज्यातील पहिले कायम स्वरूपी बालन्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे? - नाशिक


Q3. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? -

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर


Q4. खालील पैकी कोणते शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते - 

नाशिक


Q5. 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती? -

 7 वी


Q6. राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालील पैकी कोणत्या शहरात आहे? - 

धुळे


Q7. मोबाईल तंत्र ज्ञानात नेहमी उल्लेख होत असलेल्या जी .एस.एम. (GSM) मधील 'एस' म्हणजे__ - 

System


Q8. आदिवासी वन संरक्षण कायदा कोणत्या साली पारित झाला? - 

2004


Q9. बाभळी प्रकल्प कोणत्या दोन राज्यामधील वादाचा मुद्दा बनला? - महाराष्ट्र - 

आंध्रप्रदेश


Q10. मुंबई पुणे द्रुतगती मार्गास (Express Way) कोणाचे नाव देण्यात आले आहे? -

 यशवंतराव चव्हाण


Q11. 'Planned Economy for India' (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला? -

 एम. विश्वेश्वरैय्या


Q12. Q12. ASEAN ची 21वी शिखर परिषद नुकतीच कोणत्या देशात पार पडली? - 

कंबोडिया


Q13. अमेरिकेत स्थापन्यात आलेल्या कोणत्या गुरुद्वारास नुकतीच १०० वर्षे पूर्ण झालीत? - 

स्टोकटोन गुरुद्वारा साहिब


Q14. खालील पैकी कोणत्या राज्यातील एका दलित वस्तीस नुकतेच म्यानमार च्या नेत्या आन सान्ग स्यू की ह्यांचे नाव देण्यात आले आहे? - 

आंध्र प्रदेश


Q15. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतेच पाकिस्तान भेटीदरम्यान तक्षिला या प्राचीन शहरास भेट दिली, तक्षिला पाकिस्तानातील कोणत्या प्रांतात आहे? -  

पंजाब


Q16. नुकतेच कोणत्या देशातील संसदेने १९८४ सालच्या शीख विरोधी दंग्यांना "जाती संहार" (Genocide) म्हणून निवेदन जारी केले आहे? -

 ऑस्ट्रेलिया


Q17. 2 ते 6 जानेवारी 2013 ह्या कालावधीत कोची (केरळ) येथे झालेल्या प्रवासी भारतीय दिवसाचे मुख्य अतिथी कोण? -

राजकेश्वर पुरयाग (Mauritius)


Q18. डिसेंबर २०१२ मध्ये आयोजित बारामती (जिल्हा: पुणे) येथे होणार्‍या नाटय़संमेलनाचे अध्यक्षस्थान कोण भूषविणार आहे? - 

डॉ. मोहन आगाशे


Q19. World Economic Forum ने जारी केलेल्या आर्थिक विकास सूची मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? - 

40वा


Q20. 2012 चा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार कोणास मिळाला आहे? - 

गुलजार


Q21. 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता? - 

नंदुरबार


Q22. 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? -

मुंबई उपनगरे


Q23. ११व्या योजनेत सर्वाधिक खर्चाच्या पहिल्या ३ क्षेत्रांचा उतरता क्रम लावा.

अ. ऊर्जा ब. सामाजिक सेवा क. वाहतूक

- ब. अ. क.


Q24. केंद्रीय नियोजन मंडळ खालील पैकी कोणाच्या अधिनस्थ कार्य करते? - 

पंतप्रधान कार्यालय


Q25. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत खालील पैकी कशात घट झाली नाही? -

किमतींचा निर्देशांक


Q26. महाराष्ट्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? -

 पालक मंत्री


Q27. 1936 मध्ये 'नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा' असा संदेश कोणी दिला? -

 एम. विश्वेश्वरैय्या


Q28. पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरु करण्यात आले? - 

भाक्रा- नांगल प्रकल्प, सिंध्री खत कारखाना, Hindustan Antibiotics, पिंप्री


Q29. भारतात सेवा कर लागू करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली? - 

88 वी


Q30. घटनेत बजेटला काय म्हणून संबोधण्यात आले आहे? -

 वार्षिक वित्तीय विवरण पत्र


Q31. महाराष्ट्रात कोणत्या पिकाकरिता 'इक्रिसॅट' (Icrisat) तंत्र अवलंबिले जाते? - 

भुईमूग


Q32. खालीलपैकी कोणती एक रबी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र, मोहोळ येथून निर्माण झाली आहे? - मालदांडी -

35-1


Q33. भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली? - 

1966 - 67


Q34. देशातील पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते मुख्यमंत्री कोण? - 

गोविंद वल्लभ पंत (1957)


Q35. खालीलपैकी कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामात घेतले जाते? - 

सूर्यफूल


Q36. 2011 चा 'साहीत्य अकादमी ' चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला? - 

वार्‍याने हालते रान


Q37. कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील 'महाविभाजन वर्ष' म्हणतात? -

 1921


Q38. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे? - 

925


Q39. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर ___ असे करण्यात आले. -

 रायगड


Q40. "स्त्री व पुरुष दोहोंना समान कामाचे समान वेतन" हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते? - 

मार्गदर्शक तत्त्वे


Q41. ठक्कर बाप्पा यांनी __ या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे? - 

आदिवासी कल्याण


Q42. आगरकरांनी १५ ऑक्टोबर १८८८ रोजी सुरु केलेल्या 'सुधारक' या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते (English Edition)? -

 गो. कृ. गोखले


Q43. __ यांनी रत्नागिरी येथे 'पतित पावन मंदिर' बांधले. - 

स्वातंत्र्यवीर सावरकर


Q44. अमरावती येथे सन १९३२ मध्ये 'श्री शिवाजी शिक्षण संस्थे'ची स्थापना कोणी केली? -  

डॉ. पंजाबराव देशमुख


Q45. __ हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे १८९१ मध्ये प्रकाशित झाला. - 

सार्वजनिक सत्यधर्म


Q46. खालील पैकी कोणास 'काळकर्ते परांजपे' म्हणून ओळखले जाते? -

 रघुनाथराव परांजपे


Q47. "आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील " हा निबंध __ यांनी लिहिला. - 

गोपाळ गणेश आगरकर


Q48. खालील पैकी कोणी 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' चे अध्यक्ष पद भूषविले होते? - 

शाहू महाराज


Q49. 'सब भूमी गोपाल की' व 'जय जगत' या घोषणांचे व त्यामागील विचार धारेचे श्रेय __ यांना जाते. - 

विनोबा भावे


Q50. 'भारतीय सामाजिक परिषदे' च्या स्थापनेचे श्रेय न्यायमूर्ती रानडे यांना जाते, कोणत्या वर्षी या परिषदेची स्थापना करण्यात आली? -

 1887


Q51. संगीत कला केंद्राच्या वतीने दिला जाणारा 'आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार' या वर्षी कोणाला जाहीर झाला आहे? -

 यमुनाबाई वाईकर


Q52. खालील पैकी कोणता व्हिडीओ नुकताच यु-ट्यूब वरील सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ ठरला आहे? (more than 80crore views) -

 गैंगनाम स्टाइल


Q53. शालेय स्तरावर संगणकामार्फत शिक्षण देण्याच्या हेतूने खालील पैकी कोणती योजना सुरु करण्यात आली? -  विद्यावाहीनी


Q54. भारताचे पहिले विज्ञान धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले? - 

1958


Q55. ' Y2K ' ही संगणक क्षेत्रातील समस्या कोणत्या वर्षाशी संबंधित होती? - 

2000