महाराष्ट्रातील लेणी

अजिंठा (लेणी)

प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा गावाजवळची लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी. पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः इ.स.पूर्वीच्या दुसर्‍या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून बुद्धाचे दर्शन स्तूप-रूपांत होते. ही सोडून १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यांतून बुद्धाचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजांचा राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते. वाकाटक साम्राज्याच्या ऱ्हासानंतर यांचे निर्माण अचानक थांबले व ही लेणी योजित भव्यतेपासून वंचितच राहिली


अजिंठा-वेरूळची लेणी

"भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्राचीन अजिंठा-वेरूळची लेणी ही वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात निर्मिली गेली. ही लेणी त्यांच्यातील स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा गावाजवळची लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी. कालांतराने तिचे रूपांतर एका नितांतसुंदर अशा चित्रकला व शिल्पकला दालनांत झाले. मात्र या लेण्यांची मूळ रचना एखाद्या धार्मिक शिक्षणसंस्थेसारखी आहे.


पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः इ.स.पूर्वीच्या दुसऱ्या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून बुद्धाचे दर्शन स्तूप-रूपांत होते. ही सोडून १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यांतून बुद्धाचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजांचा राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते.


वाकाटक साम्राज्याच्या ऱ्हासानंतर यांचे निर्माण अचानक थांबले व ही लेणी नियोजित भव्यतेपासून वंचितच राहिली."


जखीणवाडी लेणी

जखिणवाडी लेणी महाराष्ट्राच्या कराड शहरा जवळची लेणी आहेत. कराड च्या भोवती अगाशिव, पाल किंवा पाली, सदाशिवगड आणि वसंतगड असे चार डोंगर आहेत. प्रत्येकाला स्वःतचा इतिहास आहे. जखिणवाडी हे कराडपासून साधारण २ किमी अंतरावर असलेले एक गाव आहे. साधारण १,००० लोकवस्ती असलेले आहे. अगाशिवच्या डोंगरावर ही लेणी असल्याने हि अगाशिवची लेणी असेही म्हणतात. गावात मळाई देवीचे प्राचीन मंदीर आहे. जवळच दत्ताचे एक नवीन देऊळ असून ते देखील प्रेक्षणीय आहे.


पांडवलेणी, नाशिक

"पांडवलेणी ही सुमारे इ.स. १२०० च्या दरम्यान खोदलेली बौद्ध लेणी आहेत. भारत सरकारने या लेणीला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ३ एप्रिल, इ.स. १९१६ रोजी घोषित केलेले आहे.[१] सातवाहन राजांनी या गुहा खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखात आढळून येतो. यात अनेक गुहा असून काही गुहा अतिशय कलाकुसरीने कोरलेल्या आहेत. यातील स्त्रियांचे अलंकार आणि वस्त्रे अतिशय कलाकुसरीनी कोरलेली आढळतात. या गुहांमध्ये एक प्रमुख चैत्यगृह आढळते जे संपूर्ण सुस्थितीत आहे. पूर्व दिशेचे प्रवेशद्वार सुस्थितीत आहे.

[पुर्व दिशेचे प्रवेशद्वार]

पांडवलेणे पूर्व दिशेचे प्रवेशद्वार - सकाळचे दृश्य


काही पश्चिमेकडील लेण्यांचे बांधकाम अर्धवट राहिलेले दिसून येते."


पाटेश्वरची लेणी

पाटेश्वरची लेणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील लेणी आहेत. सातारा शहरापासून १४ किमीवर देगाव हे गाव आहे. या गावाच्या मागे असलेल्या बामणोली डोंगररांगेतल्या एक डोंगरावर पाटेश्वराचे मंदिर व लेणी आहेत. या लेण्यांची समुद्रसपाटीपासून उंची ३०२५ फूट आहे. पाटेश्वरचे वैशिष्ट्य म्हणजे लेण्यांमध्ये आणि मंदिरामध्ये विविध आकारात, प्रकारात, कोरलेल्या अगणित "शिवपिंडी". येथे बोटाच्या पेरा एवढ्या लहान आकारापासून ते अंदाजे ४ फूट उंचीच्या पिंडी पाहायला मिळतात. अशीच विविधता पिंडींच्या कोरीव कामातही आढळते.


मागाठाणे लेणी

मागाठाणे लेणी ही इसवी सनाच्या सहाव्या शतकात बनविलेली बौद्ध लेणी आहेत. मुंबईतील बोरीवली स्थानकाच्या पूर्वेस बाहेर पडल्यानंतर पश्चिम द्रुतगती मार्गाच्या दिशेने जाणारा एक रस्ता दत्तपाडा फाटक मार्गावरून मागाठाणेच्या दिशेला येताना टाटा स्टीलच्या आधी उजवीकडे असलेल्या बैठ्या वस्तीमध्ये ही मागाठाण्याची अतिशय महत्त्वाची लेणी पाहायला मिळतात.

ह्या परिसराचा उल्लेख कान्हेरी लेण्यांपैकी २१ क्रमांकाच्या लेण्यातील शिलालेखात 'इथूनच जवळ असलेल्या मग्गठाणे येथील अधेलीची जमीन कल्याण येथील व्यापारीश्रेष्ठी अपरेणुकाने कन्हगिरीच्या या बौद्धभिक्खू संघाला दान दिली असून त्यातून येणाऱ्या उत्पन्नाचा वापर या भिक्खूसंघाच्या निर्वाहासाठी करण्यात यावा.' असा केला आहे.

कान्हेरीच्या शिलालेखांमध्ये असलेल्या त्या जमिनीच्या बाजूला पाचव्या-सहाव्या शतकामध्ये या लेणींची निर्मिती करण्यात आली.

लेणी असलेल्या परिसराला पूर्वी मागाठाणे असे म्हणत. मुळात या लेणींवरूनच त्या परिसराला हे नाव मिळाले आहे. मग्गस्थानकपासून अपभ्रंश होत त्याचे मग्गठाणे आणि नंतर मागाठाणे असे झाल्याचे मानले जाते. काहींच्या मते मग्ग म्हणजे मार्ग आणि त्यावर थांबण्याचे ठिकाण म्हणजे मागाठाणे होय. कारण कोणतेही असले तरी मागाठाणे हे प्राचीन ठिकाण आहे, याबाबत कुणाचेच दुमत नाही. शिवाय या ठिकाणाला महत्त्व प्राप्त झाले तेही या लेणींमुळेच यातही वाद नाही.

एम. जी. दीक्षित यानी १९५०च्या दशकात पीएचडीसाठी लिहिलेल्या शोधप्रबंधाप्रमाणे ’मागाठाणे हे प्रामुख्याने शेतकऱ्यांचे आणि पशुपालकांचे गाव असून त्यांनी अनेकांनी पोर्तुगिजांच्या कालखंडामध्ये म्हणजेच १७ व्या शतकात ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला दिसतो. मागाठाणे लेणी या पोईसर लेणी या नावानेही ओळखल्या जातात. पोईसर हे मागाठाणेच्या वेशीला लागून असलेले गाव आहे. आणि ते या लेणींपासून तुलनेने जवळ आहे. या लेणींचा उल्लेख बॉम्बे गॅझेटिअरमध्येही सापडतो. बॉम्बे गॅझेटिअरमधील उल्लेखानुसार आजूबाजूला दाट हिरवी झाडी असल्याने त्या बाहेरून दृष्टीस पडत नाहीत, असा आहे. जोगेश्वरीच्या लेणींचा विशेष म्हणजे तिथे लेणी वर आणि जमीन खूप खाली आहे, तसेच चित्र आपल्याला मागाठाणे लेणींमध्येही पाहायला मिळते.'

येथील विहाराच्या छताचा काही भाग पडल्याचे दीक्षितांची नोंद वाचताना लक्षात येते. ते पुढे लिहितात..’मात्र एकूण आजूबाजूचा अंदाज घेता असे लक्षात येते की, इथे मध्यभागी मोठ्या सभागृहाप्रमाणे असलेला भाग होता. त्याची लांबी-रुंदी सुमारे पंचवीस बाय सहा फुटांची असावी. लेणींच्या पूर्वेकडील बाजूस व्हरांडा असून तिथे असलेल्या स्तंभांवर डबल क्रिसेंट पद्धतीचे अलंकरण आहे. अशा प्रकारचे अलंकरण कोकणातील कुडा आणि कान्हेरी या अगदी सुरुवातीच्या काळातील लेणींमध्ये पाहायला मिळते.’

डावीकडच्या बाजूस या लेणींचे मुख्य प्रवेशद्वार असून तिथे दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या होत्या. त्यावर दगडी झाकणेही होती. आतमध्ये असलेल्या चैत्यामध्ये सहा ते सात स्तंभांवर शंखाकृती रचना असून त्यावर फारसे अलंकरण नाही. सहाव्या शतकातील लेणींचा हा विशेष इथे पाहायला मिळतो. इथे एक सर्वात महत्त्वाचे चैत्यही आहे. किंबहुना ते या लेणींमधील सर्वात महत्त्वाचे लेणे आहे, असे म्हणता येईल. हे आकारानेही सर्वात मोठे असून लेणींच्या वायव्येस आहे, असा उल्लेख गॅझेटिअरमध्ये सापडतो.'

दीक्षितांनी ही नोंद केली त्या वेळेस या चैत्यामध्ये बाहेरच्या बाजूने आतमध्ये पाण्याची मोठी गळती सुरू होती. आजही ती गळती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. दीक्षित त्यांच्या नोंदीमध्ये लिहितात, ’हे चैत्य म्हणजे एक मोठे चौकोनी आकाराचे सभागृह असून त्याच्या दोन्ही बाजूला बसण्यासाठी बाकासारखे दगडी बांधकाम करण्यात आले आहे. समोरील भिंतीच्या एका बाजूला गौतम बुद्धाची मोठी शिल्पाकृती पाहायला मिळते. पद्मासनात बसलेला बुद्ध इथे दिसतो. शिल्पाकृतीचा मधला काही भाग कालौघात पडला आहे. तर या मोठ्या बुद्ध शिल्पाकृतीच्या दोन्ही बाजूस हातात मोठे कमळपुष्प घेतलेल्या अवलोकितेश्वराची शिल्पाकृती होती. ती आता धूसर दिसते. मात्र, या बुद्धमूर्तीच्या दुसऱ्या बाजूस धर्मचक्र मुद्रेमधील ध्यानमग्न बुद्धाच्या विविध पाच छोटेखानी शिल्पाकृती दिसतात.

इथे असलेली तोरणाची कलाकृती मात्र अप्रतिम असून त्यावर उत्तम कोरीव काम करण्यात आल्याचे दीक्षितांनी म्हटले आहे. ते लिहितात. ’त्यावर हत्ती, मकर, उडणाऱ्या अप्सरा अतिशय उत्तम पद्धतीने कोरलेल्या आहेत. वेरुळमधील विश्वकर्मा लेणींशी समांतर जाणारी अशी ही कलाकृती आहे’

येथील शिल्पाकृतींवरून या लेणींची निर्मिती सहाव्या शतकात झाल्याचे दीक्षितांनी लिहिलेे आहे. केवळ तेवढेच नव्हे तर मागाठाणेच्या आजूबाजूच्या परिसरात जे पुरातत्त्वीय अवशेष सापडतात तेदेखील हा लेणींचा परिसर सहाव्या शतकाच्या सुमारासचा असावा, असाच संकेत देतात त्यामुळे सहाव्या शतकात या परिसरात बौद्ध धर्माचे प्राबल्य होते, हेच या मागाठाण्याच्या लेणी सिद्ध करतात.


विल्होळी जैन मंदिर

विल्होळी जैन मंदिर पांडवलेण्यांपासून थोड्याच अंतरावर असलेले श्वेतांबर जैनमंदिर आहे. याचे स्थापत्य उत्कृष्ट समजले जाते.