सार्क बद्दल थोडीशी माहिती
सार्क : हे साउथ एशिअन असोशिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन चे संक्षिप्त रूप
सार्क स्थापना : 8 डिसेंबर 1985
संकल्पना : बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांनी 1977 मध्ये मांडली.
सार्कची पहिली बैठक : ढाका ,1985
सुरुवातीस 7 सदस्य राष्ट्रे होती. : भारत , पाकिस्तान , बांगलादेश, नेपाळ , मालदीव ,श्रीलंका, भूतान.
अफगाणिस्तान चा समावेश 13 नोव्हेंबर 2005 रोजी झाला . त्यामुळे आता सदस्य राष्ट्रे 8
सार्क ची 16 वी बैठक : एप्रिल 2010 मध्ये भुतान मध्ये झाली. 17 वी बैठक माले (मालदीव )
येथे नोव्हेंबर 2011 मध्ये होणे नियोजित आहे.
सार्क चे जनरल सेक्रेटरी म्हणून भारताच्या शिलकांत शर्मा यांचा कार्यकाल फेब्रुवारी 2011 मध्ये
संपला. सध्या या पदावर मालदीवच्या फातीमाथ दियाना सईद (Fathimath Dhiyana Saeed )
या विराजमान आहेत . या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत.