ऊर्जेचे स्त्रोत सामान्यज्ञान

 ऊर्जा कोणत्याही रुपात असली तरी तिच्याकडून कार्य केले जाते.

ऊदा. उष्णता ऊर्जा – उष्णता देते.

प्रकाश ऊर्जा – प्रकाश देते इ.


ऊर्जेची अनेक रूपे आहेत : -

उष्णता, प्रकाश, गतीज ऊर्जा, स्थितीज, पवन, सौर इ.


इंधन : -

व्याख्या – ज्या पदार्थाच्या ज्वलनाने ऊर्जा निर्माण होते त्याला इंधन म्हणतात.

अर्थ – आपण लाकूड जाळले तर उष्णता निर्माण होते. (आणि आपले आंघोळीचे पाणी तापते.:)) म्हणून लाकूड हे इंधन आहे.

कागद जाळला तर उष्णता निर्माण होते का? = होते.

मग कागद इंधन आहे का? = हो. व्याख्येनुसार आहे.



इंधनाचे प्रकार: -

इंधनाचे अनेक प्रकार आहेत.

या घटकात आपण केवळ जीवाश्म इंधनाचाच विचार करणार आहोत.



जीवाश्म इंधन : -

लाखो वर्षांपूर्वी आज पृथ्वी जशी दिसते तशी नव्हती. आज जिथे हिमालय दिसत आहे, तिथे भला मोठा समुद्र होता. आज जिथे वाळवंट दिसतेय, तिथे फुलांच्या बागा फुललेल्या होत्या.

मात्र पृथ्वीवर मोठी उलथापालथ झाली आणि अनेक ठिकाणी झाडे-प्राणी-पक्षी खोल जमिनीत गाडले गेले.


या गाडलेल्या झाडे-प्राणी-पक्षी यांच्यावर वरून जमिनीचा मोठा दाब पडला.

खालून पृथ्वीमध्ये असलेल्या लाव्हारसाच्या ऊष्णतेने हे झाडे-प्राणी-पक्षी भाजून निघाले.

........आणि त्यांपासून बनले ‘जीवाश्म इंधन’!


जीवाश्म इंधनाचे २ प्रकार : -

कोळसा

खनिज तेल & नैसर्गिक वायू


कोळसा : - जमिनीत गाडल्या गेलेल्या वृक्षांपासून कोळसा हे जीवाश्म इंधन मिळते.

(आपण लाकूड जाळून कोळसा तयार झालेला पाहतो, तो हा कोळसा नव्हे. ह्या कोळशाला तयार व्हायला लाखो वर्षे लागलीयेत.)



खनिज तेल & नैसर्गिक वायू : - समुद्रातील वनस्पती-पशु-प्राणी गाडले गेल्याने त्यांच्यापासून आपल्याला खनिज तेल & नैसर्गिक वायू मिळाले आहेत.



सगळी जीवाश्म इंधने ही संयुगे आहेत. ती कार्बन आणि हायड्रोजन यांपासून बनलेली आहेत. = हायड्रोकार्बन्सची संयुगे.



लाकूड – लोणारी कोळसा – दगडी कोळसा : -

हे तिन्ही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत.


लोणारी कोळसा – लाकडाला अपुऱ्या हवेत जाळा. लोणारी कोळसा मिळेल.

लोणारी कोळशाची टोपणनावे – लाकडी कोळसा, चारकोल.


दगडी कोळसा – जमिनीत २५ किमी पर्यंत खोदा. तेथे दगडी कोळसा मिळेल. लाखो वर्षांपूवी झाडे गाडली गेली. त्यांच्यावर जमिनीचा प्रचंड दाब पडला. त्यातच पृथ्वीच्या लाव्ह्याची प्रचंड उष्णता = दगडी कोळसा.



कोणता जास्त उष्णता देतो?: -

दगडी कोळसा > लोणारी कोळसा > लाकूड


१ किलो लाकूड = १७०० किलो ज्युल ऊर्जा

ज्युल : - ज्युल हे ऊष्णतेचे एकक आहे. (............क्रमशः)