महत्त्वाच्या राजकीय घटना (१९४७-२०००)
* १९४७-४८ : संस्थानांचे विलीनीकरण. हैदराबाद व जुनागडच्या विलीनीकरणासाठी पोलीस कारवाई करावी लागली. देशभर दारूबंदीची अंलबजावणी.
* १९४८ : महात्मा गांधींचा नथुराम गोडसेकडून खून (३० जानेवारी, १९४८).
* १९५० : भारतीय संविधाननिर्मित प्रजासत्ताक भारताची स्थापना (२६ जानेवारी १९५०). भारतीय जनसंघाची स्थापना, समाजवादी पक्षाची स्थापना.
* १९५२: आंध्र प्रदेश स्थापनेचा निर्णय, १९५२ (पोट्टू श्रीरामुलू यांचे उपोषण व उपोषणात मृत्यू).
* १९५५ : qहदू कोड बिलाला मान्यता (१९५५). दादरा- नगरहवेलीची पोर्तुगीज अमलातून मुक्तता, १९५५.
* १९५६ : भाषावार राज्य पुनर्रचना (नोव्हेंबर, १९५६). डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्या लाखो अनुयायांसह धर्मांतर आणि बौद्ध धर्म स्वीकार.
* १९५७ : भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना. केरळ राज्यात लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या भारतातील पहिल्या कम्युनिस्ट मंत्रिमंडळाची स्थापना (मुख्यमंत्री - ई. एम्. एस्. नंबुद्रीनाथ).
* १९५९ : इंदिरा गांधींची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
* १९६० : महाराष्ट्र राज्य व गुजरात राज्य या नवीन राज्यांची स्थापना (१ मे, १९६०).
* १९६१ : लष्करी कारवाई करून गोवा, दमण, दीव यांची पोर्तुगीज अंलातून मुक्तता. पाँडिचेरी, चंद्रनगर व माहे या फ्रेंच वसाहतींचे भारतात विलीनीकरण * १९६२ : चीनचे भारतावरील आक्रमण. भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट व चीनवादी गटातर्फे माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना
* १९६५ : भारत-पाकिस्तान युद्ध
* १९६६ : भारत-पाकिस्तान युद्ध संपुष्टात आणणारा ताश्कंद करार. इंदिरा गांधींची पंतप्रधानपदी पहिल्यांदा निवड.
* १९६७ : उत्तरेकडील अनेक राज्यांत काँग्रेसचा पराभव, काही राज्यांत काँग्रेसेतर आघाड्यांची मंत्रिमंडळे. काँग्रेसने सत्ता गमावलेली राज्ये- राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल व ओरिसा. तामिळनाडूत प्रथमच द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष सत्तेवर (१९६७).
* १९६९ : कम्युनिस्ट पार्टी (माक्र्सवादीलेलेनिनवादी)ची स्थापना. राष्ट्रपती उमेदवार निवडीवरून पंतप्रधान इंदिरा गांधी व काँग्रेस कार्यकारिणी यांच्यात मतभेद. १४ मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण. राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस उमेदवार संजीव रेड्डी यांना इंदिरा गांधी समर्थकांचा विरोध व व्ही. व्ही.गिरी यांना पाqठबा. संजीव रेड्डींचा पराभव व व्ही.व्ही.गिरी भारताचे राष्ट्रपती. काँग्रेस पक्षात फूट व ङ्कइंदिरा काँग्रेसङ्क व ङ्कसंघटना काँग्रेसङ्क या दोन स्वतंत्र पक्षांची निर्मिती. इंदिरा गांधींची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी.संस्थानिकांचे तनखे रद्द.
* १९७० : पोर्तुगालमध्ये कैदेत अडकलेले मोहन रानडे व तेलो मस्कारेन्हास या गोवा स्वातंत्र्य सैनिकांची मुक्तता. लोकसभेचे मुदतपूर्व विसर्जन.
* १९७१ : देशात प्रथमच लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून(संघटना) काँग्रेस स्वतंत्र, जनसंघ व समाजवादी यांची आघाडी) दिली गेलेली घोषणा - इंदिरा हटाओ. इंदिरा काँग्रेसतर्फे घोषणा - गरीबी हटाओ. लोकसभेच्या ५१८ जागां पैकी इंदिरा काँग्रेसने ३५२ जागा qजकल्या. (मार्च १९७१). पाकिस्तानशी युद्ध - भारताचा विजय व बांगलादेशाची निर्मिती, (डिसेंबर १९७१).
* १९७२ : शिमला शांतता करार. राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे बरखास्त व राज्यातील निवडणुकांतही इंदिरा काँग्रेसचा सर्वत्र विजय, (१९७२).
* १९७४ : पोखरण येथे अणुबॉम्बची चाचणी. रेल्वेचा देशव्यापी संप (मे १९७४).
* १९७५ : सिक्कीमचे भारतात विलीनीकरण. इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण या निवडणूक खटल्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जगमोहन सिन्हा यांनी इंदिरा गांधी यांना दोषी ठरवून त्यांची निवडणूक रद्द केली व त्यांना सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी केली (जून १९७५). विरोधी पक्षांकडून इंदिरा गांधींच्या राजीनाम्याची मागणी. इंदिरा गांधींनी देशभर आणीबाणी पुकारली. देशभर विरोधी पक्षनेत्यांची धरपकड, वृत्तपत्रांवर पूर्वतपासणी लागू, मुलभूत हक्क निलंबित. राष्ट्रीय
स्वयंसेवक संघावर बंदी. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी, रामभाऊ म्हाळगी, लालकृष्ण अडवाणी, मधू लिमये, मृणाल गोरे, राजनारायण, विजयाराजे 'शिंदे, ज्योती बसू, समर गुहा, नानाजी देशमुख, चौधरी चरणसिंग, पिलू मोदी, अशोक मेहता इ. नेत्यांना अटक. १९७७ च्या मध्यावधी निवडणुकांसाठी संघटना काँग्रेस, स्वतंत्र पक्ष, जनसंघ व समाजवादी पक्ष इत्यादी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना. वरिष्ठ काँग्रेस नेते जगजीवनराम, हेवतीनंदन बहुगुणा, नंदिनी, सत्पथी यांनी इंदिरा गांधींविरुद्ध बंड करून ङ्कलोकशाहीवादी काँग्रेसङ्क पक्षाची स्थापना केली व जनता पक्षाच्या बरोबरीने निवडणुका लढवल्या. उत्तर भारतात इंदिरा
काँग्रेस पक्षाचा पराभव. इंदिरा गांधी व संजय गांधी पराभूत झाले. जनता पक्षाचा प्रचंड विजय. दक्षिणेत इंदिरा काँग्रेस पक्षाला यश. इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली व पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. जनता पक्षाच्या विजयानंतर केंद्रात जनता पक्षाचे सरकार व पंतप्रधानपदी मोरारजी देसाई. युसुफ पटेल, हाजी मस्तान, सुकुर नारायण बाखिया यांच्यासह २५० तस्करांची जयप्रकाश नारायण यांच्या उपस्थितीत शरणागती.
* १९७९ : जनता पक्षातील जुन्या जनसंघीय लोकांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील निष्ठेच्या प्रश्नावरून जनता पक्षात मतभेद व फूट. मोरारजी देसार्इंचा राजीनामा व चौधरी चरणसिंग, इंदिरा काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर पंतप्रधानपदी. लोकसभेत चरणसिंग शासनाला पाठिंबा देण्यास इंदिरा काँग्रेसचा नकार. लोकसभा विसर्जित.
* १९८० : १९८० मध्ये पुन्हा मध्यावधी निवडणुका होऊन त्यात इंदिरा काँग्रेस पक्षाला बहुत प्राप्त झाले. जनता पक्षाचा पराभव व इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधानपदी. जनता पक्षात पुन्हा फूट. जनसंघ गट पक्षाबाहेर व या गटातर्फे ङ्कभारतीय जनता पार्टीङ्क या पक्षाची निर्मिती. पंजाबमध्ये शीख फुटीरतावाद-दहशतवादाचा उदय.
* १९८२ : आसाममध्ये विद्याथ्र्यांचे बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध आंदोलन
* १९८३ : फूलनदेवीची मध्य प्रदेशात मुख्यमंत्री अर्जुनसिंग यांच्या उपस्थितीत शरणागती * १९८४ : अमृतसर सुवर्णंदिरात लपलेला दहशतवादी जर्नेलसिंग भिद्रनवाले व त्याचे अनुयायी यांच्याविरुद्ध लष्करी कारवाई सुवर्ण ंदिर मुक्त. या कारवाईत भिद्रनवाले सहित अनेक सैनिकांचा मृत्यू (जून १९८४-ङ्कऑपरेशन ब्ल्यू स्टारङ्क) या पाश्र्वभूमीवर शीख शरीररक्षकांकडून इंदिरा गांधींची हत्या (३१ ऑक्टोबर, १९८४). इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधींची पंतप्रधानपदी निवड
* १९८५ : पंजाब समस्येवर राजीव गांधी-लोंगोवाल करार. केंद्र शासन व आसाम गण परिषद-आसाम करार.
* १९८६ : जनरल अरुणकुमार वैद्य यांचा पुण्यामध्ये शीख दहशतवाद्यांकडून खून. बोफोर्स तोफा खरेदीतील भ्रष्टाचार. संरक्षणमंत्री व्ही. पी. qसग यांचा राजीनामा
शाहबानो खटला - इंदूरची मुस्लिम घटस्फोटित महिला शाहबानो हिच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाचा पोटगी खटल्यात निकाल. देशभर मुस्लिम समाज, नेते व
राजकीय पक्ष यांच्याकडून सर्वाेच्च न्यायालयावर मुस्लिम कायद्यात हस्तक्षेप केल्याचा आरोप व निषेध. मुसलमानांच्या दडपणाखाली राजीव गांधी शासनाने
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाद ठरवणारी घटना- दुरुस्ती केली. या मुद्यावर निषेध म्हणून केंद्रीय राज्यमंत्री आरिफ मोहंद खान यांचा तत्त्वनिष्ठ भूमिके
तून मंत्रिपदाचा राजीनामा. रामजन्मभूी मंदिराची दारे उत्तर प्रदेश काँग्रेस शासनाने उघडली.
* १९८९ : अयोध्या येथे केंद्र शासनाच्या संतीने मंदिर शिलान्यास.१९८९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्ष अल्पमतात. भाजपा व कम्युनिस्ट पक्षांच्या
पाठिब्या वर जनता दलाच्या व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकारची स्थापना. मंडल आयोगाच्या शिफारशींच्या अंलबजावणीचा निर्णय,
अयोध्या रथयात्रा बिहारमध्ये अडवून तेथील लालूप्रसाद शासनाने रथयात्रेचे नेते लालकृष्ण अडवाणींना अटक. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने व्ही.
पी.qसग शासनाचा पाqठबा काढून घेतला व ते शासन कोसळले.
* १९९० : काँग्रेसच्या पाqठब्यावर चंद्रशेखर पंतप्रधान बनले
* १९९१ : काँग्रेसने पाqठबा काढल्याने १९९१ मध्ये चंद्रशेखर सरकार पडले. १९९१ मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. तमिळ दहशतवाद्यांनी राजीव गांधी यांची तमिळनाडूत श्रीपेरुम्बुदूर येथे हत्या केली. परंतु सर्वात मोठा पक्ष काँग्रेस पक्षाने नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात शासन स्थापन केले. लोकसभेत बहुत सिद्ध
करून या शासनाने १९९६ पर्यंत राज्य केले. नरसिंह राव शासनाने खाऊजा (खाजगीकरण-उदारीकरणजागतिकीकरण) धोरणाचा प्रारंभ केला.
* १९९२ : डिसेंबर १९९२ मध्ये अयोध्या आंदोलन कळसाला पोचले व qहदू कारसेवकांनी ६ डिसेंबर, १९९२ रोजी तथाकथित ङ्कबाबरी मशीदङ्क उद्ध्वस्त केली व मूळ जागी रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना केली. देशभर जातीय दंगली झाल्या.
* १९९३ : १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत एकाच वेळी दहा ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले.
* १९९८ : १९९६ ते १९९८ या कालखंडात अटलबिहारी वाजपेयी, एच्. डी. देवेगौडा व इंदरकुमार गुजराल यांची सरकारे केंद्रात आली.१९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेत. पोखरण येथे अणुबॉम्ब व हायड्रोजन बॉम्बचे चाचणी स्फोट.
* १९९९ : कारगीलच्या लढाईत पाकिस्तानचा पराभव. वाजपेयींचा लाहोरला बसयात्रेद्वारे भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याचा प्रयत्न. लोकसभा निवडणुका
झाल्या व पुन्हा वाजपेयींचे सरकार केंद्रात आले.