जागतिक प्राणी दिन – ४ ऑक्टोबर
दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
टोपणनाव – जागतिक प्राणीप्रेमी दिवस (World Animal Lover Day)
उद्देश :-
प्राणी आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा सन्मान म्हणून ....
पशु-पक्षी, प्राणी यांच्या संरक्षणाचे निकष आधुनिक घडामोडींना अनुरूप बनवणे. = (प्राणी संरक्षणाचे कायदे काळ बदलतो तसे जुने बनत जातात. अनेक शिकारी आणि तस्कर या कायद्यांत पळवाटा शोधतात. त्यामुळे असे कायदे काळाला सुसंगत बनवणे.)
प्राण्यांचे कल्याण व्हावे असे वाटणाऱ्या संघटना, संस्था जगभरात आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. त्यांच्यात समन्वय निर्माण करणे. (एकेकट्याने काम करण्यापेक्षा एकत्र येऊन काम करणे = जास्त परिणामकारक रिझल्ट्स!)
चला इतिहासात डोकावूया : -
१९३१ साली फ्लोरेंस, इटली येथे पर्यावरण शास्त्रज्ञांची एक परिषद भरली होती. त्यात धोक्यात आलेल्या (नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या) प्राण्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे या वर्षापासून (१९३१ पासून) जागतिक प्राणी दिन साजरा केला जात आहे.
४ ऑक्टोबरच का? : -
असिसीचे संत फ्रान्सिस हे प्राण्यांवर अतिशय प्रेम करीत.
४ ऑक्टोबर हा त्यांचा ‘उत्सव दिन’ (Feast Day)!
म्हणून त्यांच्या सन्मानार्थ ४ ऑक्टोबर हा दिवस जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा केला जातो.