नागरिकांची मुलभुत कर्तव्ये

 नागरिकांची मुलभुत कर्तव्ये :-

संविधानाचे पालन करणे आणि तत्वाप्रणीत आदर्श व संस्था , राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे .

ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे . 

भारताची सार्वभौमता , एकता व एकात्मता उन्नत  राखणे व त्यांचे संरक्षण करणे 

आवाहन केले जाइल तेव्हा देशाचे संरक्षण करणे व राष्ट्रीय सेवा बजावने 

धार्मिक , भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाउन अखिल भारतीय जनतेमध्ये एकोपा व भ्रातृभाव वाढीला लावणे ;

स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथा सोडून देणे . 

आपल्या संमिश्र संकृतीच्या  वारश्याचे मोल जाणून तो जतन करणे . 

आराण्ये , सरोवरे,  वन्य जीवसृष्टी यासुद्धा नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि सजीव प्राण्यांबाबत दयाबुद्धी बाळगणे . 

विज्ञान निष्ठ दृष्टीकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी  व सुधारणावाद यांचा विकास करणे . 

सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे व हिंसाचाराचा  निग्रहपूर्वक त्याग  करणे .  

राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाइल आश्याप्रकारे  सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे .