मुलभुत अधिकार

 समानतेचा अधिकार :-

कायद्यापुढे समानता 

धर्म , वंश , जात , लिंग , जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करण्यास मनाई 

स्त्रिया व बालके यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंद होणार नाही . 

सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबींमध्ये समान संधी . 

अस्पृश्यता नष्ट करणे


स्वातंत्र्याचा अधिकार :-

भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा 

शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा 

अधिसंघ वा संघ बनविण्याचा . 

भारताच्या राज्याक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा .   

भारताच्या राज्याक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा .   

कोणताही पेशा आचरण्याचा अथवा  कोणताही व्यवसाय ,उदीम किंवा धंदा चालविण्याचा .   

अपराधांबद्दलच्या  दोष सिद्धी बाबत संरक्षण 

जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे रक्षण . 

विविक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण 


शोषणाविरुद्धचा अधिकार :-

माणसांना अपव्यवहार  आणि वेठ  यांना मनाई . 

कारखाने इ. मध्ये वा धोक्याच्या कामावर चौदा वर्षे वयाखालील बालकांना कामावर ठेवण्यास मनाई . धर्मस्वातंत्र्याचा अधिकार :-

सद्सदविवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रतिज्ञापन आचरण व प्रसार 

धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य . 

एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबत स्वातंत्र्य . 

विविक्षित शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य . 


सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार :-

अल्पसंख्यांक समाजाच्या हितसंबंधांचे संरक्षण 

अल्पसंख्यांक समाजांच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार